आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल कर्मचारी असल्याचे सांगून हप्ते उकळणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - उदगीर तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी असल्याचे भासवून वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून हप्ता घेणाऱ्या एकावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून कारवाई करण्यात आली.  त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
उदगीर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होते आहे. सरकारी निविदा निघालेल्या नसतानाही वाळूची वाहतूक होत असल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना हप्ते द्यावे लागतात, असे सांगून मारोती शिवाजी निलेवाड (वय २४, रा.अनुपवाडी ता.उदगीर) हा दर महिन्यात प्रत्येक गाडीकडून १५०० रुपये घेत होता. त्याचा दर वाढत चालल्यामुळे वैतागलेल्या एक वाळू तस्कराने लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. पैसे मागणारा व्यक्ती शासकीय कर्मचारी असल्याचे समजल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सोमवारी रात्री एका पानटपरी शेजारी येऊन शिवाजी निलेवाड याने ट्रक चालकाकडून पैसे स्वीकारले.   त्याचवेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.


तोतया कर्मचारी निघाला : तहसीलमधील कर्मचाऱ्याला पकडल्याचे पोलिसांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना कळवले. परंतु शिवाजी निलेवाड नावाचा कोणताच कर्मचारी उदगीर तहसील कार्यालयात कार्यरत नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. त्यावर विचारणा केली असता आपण खोटे ओळखपत्र बनवून हप्ते गोळा करीत होतो, अशी कबुली शिवाजी निलेवाड याने दिली. त्यामुळे  त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल करावा याविषयी सोमवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत काथ्याकुट सुरू होता. अखेर तो खासगी व्यक्ती असल्यामुळे त्याच्यावर  खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...