आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठ्यात 2 गटांत हाणामारी, CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासून शोधले तब्बल 43 आरोपी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा - गुरुवारी सायंकाळी नमाजच्या वेळेस लग्नातील डीजे बंद करण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली होती. यात एका गटाने अजिंठा पोलिस ठाण्यात जाऊन दगडफेक केली होती. यात एपीआय किरण आहेर, महिला पोलिस कविता कुलथे, दत्तात्रय मोरे हे जखमी तर पोलिस केबिन, पोलिस वाहन हे दगडफेकीत फोडले होते.

 

अजिंठा पोलिस ठाण्यात दगडफेक प्रकरणी पोलिसांनी रात्रभर सीसीटीव्ही कॅमेरे तपासून ४३ नावे निष्पन्न केली. सध्या १७ जणांना अटक करण्यात आली असून अनेक जण फरार आहेत. पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन केले. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनीच फिर्याद देत १७ जणांना गुरुवारी रात्री अटक केली. इतर दीडशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेत.

 

आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा, शासकीय मालमत्तेचे नुकसान, जनतेत दगड फेकून दहशत निर्माण करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी दंगा काबू पथकाच्या दोन तुकड्या गावात बंदोबस्तासाठी तैनात  केल्या आहेत.


अजून दीडशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून गावातील  सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षण किरण आहेर यांनी सांगितले.   

बातम्या आणखी आहेत...