आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेत बटईने दिल्यास 18% जीएसटी लागेल हा काँग्रेसचा अपप्रचार : माेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत - पिढ्यान्पिढ्या सत्तेचा उपभोग घेणारे लोक आता गरिबांसाठी केल्या जाणाऱ्या कामाची थट्टा करत आहेत. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने ते शेतकऱ्यांसंदर्भात खोट्या बातम्या पसरवत आहेत. अगोदर आरक्षणाबाबत ते खोटे बोलले, आता शेतकऱ्यांची जमीन बटईने किंवा कंत्राटावर दिल्यास १८ टक्के जीएसटी द्यावा लागेल असा   खोटा संदेश पसरवत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.

 

रविवारी दिल्ली- मेरठदरम्यानच्या ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘एनडीए सरकारचे काम पाहून काही लोक धास्तावले आहेत. काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयावरही प्रश्नचिन्ह उभे केले. प्रसारमाध्यमे त्यांना पक्षपाती वाटत आहेत. सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या लष्कराचे साहसही नाकारत आहेत.’

 

दिल्ली ते मेरठ अंतर ४५ मिनिटांत
दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे ९६ किमी आहे. एकूण ७५०० कोटींचा खर्च त्यासाठी केला  आहे. ९ किमी लांबीचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी ८४१ कोटींचा खर्च आला. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरांतील प्रवास फक्त ४५ मिनिटांत पूर्ण करता येईल.

 

माेदींनी केला सहा किमीचा राेड शाे
एनडीए सरकारच्या काळात दोन आधुनिक एक्स्प्रेस वेचे उद््घाटन झाले. हे केवळ एक उदाहरण असून पुढे खूप काम करणे बाकी असल्याचे माेदी म्हणाले. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेच्या ९ किमी कामाचे मोदींनी उद््घाटन केले. या वेळी त्यांनी ६ किलोमीटरचा रोड शोही केला.

बातम्या आणखी आहेत...