आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जलयुक्त'मध्ये अपहार; १३८ संस्थांवर गुन्हे दाखल; २ कोटी ४१ लाखांच्या अपहाराचा ठपका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- परळी तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात अनियमितता, बोगस नोंदी व अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ही कामे करणार्‍या १३८ संस्थांवर गुरुवारी परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान या प्रकरणात या पुर्वीच कृषी विभागाच्या २४ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे. आता या कामांतील संस्थांवर कारवाई करण्यात आली असून एकच खळबळ निर्माण झाली आहे. 


सन २०१५ ते २०१७ या काळात परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेतून विविध प्रकारची ३०७ कामे करण्यात आली होती. यामध्ये अधिकारी आणि कामे करणाऱ्या संस्था यांच्या संगणमतातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता. याबाबत कृषी आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. यानंतर पुण्याच्या आयुक्त कार्यालयातील दक्षता पथकाने सर्व कामांची चौकशी करुन दिलेल्या अहवालानंतर २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. ८ मार्च रोजी २४ जणांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले होते. दरम्यान, यानंतर आता ही कामे करणाऱ्या संस्थांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 


शासनाची केली फसवणूक 
कामात अनियमितता, मापन पुस्तिकेत बोगस नोंदी, प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून शासनाची फसवणूक करणे यासह एकूण २ कोटी ४१ लाखांच्या अपहाराचा ठपका ठेवत १३८ संस्थांविरुद्ध गुरुवारी परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले. कृषी विभागाच्या आदेशानंतर कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी या संस्थांविरोधात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक डी. के. शेळके तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...