आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दासू वैद्य, चौसाळकर, वराटांना अंबाजोगाई मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने प्रा डॉ. दासू वैद्य, निशा चौसाळकर यांच्यासह विश्वंभर वराट यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या पुरस्काराचे आठव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती  मसाप अंबाजोगाईचे अध्यक्ष अमर हबीब, संमेलनाचे स्वागताध्यक्ष संतोष मोहिते यांनी दिली.

 

अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या दिवंगत अध्यक्षांच्या नावानेे पुरस्कार देण्यात येतात. मंदाताई देशमुख साहित्य पुरस्कार  यंदापासून सुरू केला जात असून त्याचे पहिले मानकरी म्हणून कवी प्रा. डॉ. दासू वैद्य यांची निवड करण्यात आली. डॉ. शैला लोहिया यांच्या नावे दिला जाणारा तिसरा लेखिका पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री निशा चौसाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. तर डॉ. संतोष मुळावकर यांच्या नावे दिला जाणारा तिसरा शिक्षक-लेखक पुरस्कार प्रसिद्ध लेखक व कवी विश्वंभर वराट यांना दिला जाणार आहे. अंबाजाेगाई येथे नुकत्याच झालेल्या मसापच्या कार्यकारिणीच्या बैठकीत दगडू लोमटे, प्रा. विष्णू कावळे, डॉ. वैशाली गोस्वामी कुलकर्णी, किरण देशमुख  यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या २३ व २४ जून रोजी  होणाऱ्या आठव्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष गणपत व्यास व उद‌्घाटक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते हे पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...