आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यसनमुक्ती संमेलन: सकाळी निघाली दिंडी, दुपारी उद्घाटनाअाधीच संमेलन रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - महिनाभराच्या मेहनतीनंतर बीड शहरात प्रथमच दोनदिवसीय सहावे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी उद्घाटनाचा दिवस उजाडला. सकाळी साडेनऊ वाजता व्यसनमुक्ती दिंडीचे उद्घाटन होऊन  शहरातील प्रमुख मार्गावरून व्यसनमुक्तीची दिंडी जनजागृती करत मार्गस्थ झाली. तीन तासांनंतर ही दिडी संमेलनस्थळ असलेल्या पारसनगर माने कॉम्प्लेक्स येथे दुपारी १ वाजता पोहोचली. संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याने व्यासपीठावर तयारी जोरात सुरू होती.

 

तेवढ्यात  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे एक पत्र  अधिकारी घेऊन कार्यक्रमस्थळी आले. आयोगाने उस्मानाबाद-लातूर-बीड या विधान परिषदेचा निवडणूक आचारसंहिता जाहीर केल्याने    हे संमेलन स्थगित करण्यात येत असल्याचे  समाजकल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे शिवसंग्रामसह संमेलनासाठी आलेल्या लोकांची निराशा झाली. या संमेलनासाठी शासनाने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. 

 
सामाजिक न्याय  व विशेष साहाय्य विभागांतर्गत व्यसनमुक्ती अभियानांतर्गत  बीड येथे २१ व २२ एप्रिल रोजी सहाव्या  राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाचे  बीड  शहरातील पारसनगर  माने कॉम्प्लेक्स येथे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी  अामदार विनायक मेटे  यांची निवड करण्यात आली होती. शनिवारी सकाळी ९.३० वाजता  बीड शहरातील डाॅ. बाबासाहेब अांबेडकर  यांच्या पुतळ्याजवळ व्यसनमुक्ती दिंडीचे उद्घाटन करण्यात आले होते.

 

उद्घाटनासाठी मान्यवर उपस्थित

दुपारी एक वाजता संमेलनाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते  होणार होते. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, संमेलनाध्यक्ष डॉ.अभय बंग यांच्यासह प्रमुख उपस्थितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित राहणार होते. दुपारी एकच्या दरम्यान  व्यासपीठावर  संमेलनाचे स्वागताध्यक्ष अामदार मेटे, मकरंद अनासपुरे, डॉ. अभय बंग  हे कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गेल्यानंतर काही वेळातच  संमेलनाचे उद््घाटन सुरू होणार होते. परंतु उस्मानाबाद-लातूर-बीड या मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्याने  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच संमेलना रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...