आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातपाय बांधत पेटवून दिलेल्या विवाहितेचा मृत्यू, 5 दिवसांपासून सुरू होते उपचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - कौटुंबिक वादातून केज तालुक्यातील विडा गावात ९ मे रोजी रात्री बारा वाजता विवाहितेला तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी हातपाय बांधून अंगावर रॉकेल ओतत पेटवून दिल्याची घटना घडली होती. ८० टक्के भाजलेल्या विवाहितेचा अखेर पाच दिवसांच्या उपचारानंतर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. अश्विनी समीर जाधव ( २३) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.   


विडा येथील अश्विनी जाधव या विवाहितेस तीन मुली व एक वर्षाचा मुलगा असून पती समीर जाधव, सासरा भीमराव जाधव, सासू सुमन जाधव कौटुंबिक वादातून तिचा छळ करीत होते. बुधवारी (ता. ९) रात्री जेवण आटोपून झाल्यावर  घरातील लोक झोपी गेले. अश्विनी हीस रात्री १२ वाजेच्या सुमारास मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आले. हा प्रकार पाहून घाबरलेल्या तिच्या मुलांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना जागे केले.

 

शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली तेव्हा अश्विनी ही पेटलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी आग विझवून तिला उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र ८० टक्के भाजलेल्या अश्विनीची प्रकृती गंभीर असल्याने तिला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले. पाच दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर  उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अश्विनीचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...