आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसंबंधातून हल्ला झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कृष्णा शिरसाठ असे मृताचे नाव आहे. 


बुधवारी रात्री कृष्णा शिरसाठवर दर्शना हॉटेलसमोरील चौकात दोघांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला होता. यात कृष्णा शिरसाठ हा युवक गंभीर जखमी झाला होता. चंदनझिरा पोलिसांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यास उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोर शोएब चाऊस व अरबाज शेख यांना अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...