आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड- धनगर आरक्षण आणि सोलापुर विद्यापीठाच्या नामांतरासाठी यशवंत सेना धनगर समाजाच्यावतीने भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो धनगर बांधव सामिल झाले होते. यावेळी सोन्नर यांनी सांगितले की सरकार ने अद्याप आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला नाही. आमची सत्ता आली की पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यांनी दिले होते. 'धनगड' व 'धनगर' या चुकीच्या झालेल्या उच्चारामुळे ही चूक दुरुस्त करण्यासाचे काम 'टीस' या संस्थेला अभ्यास करण्यासाठी दिले आहे. आज चार वर्षे झाली आहे तरी देखील अहवाल शासनाकडे दिलेला नाही.
केवळ वेळकाढू धोरण या सरकारने अवलंबले आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. आम्हाला घटनेने दिलेले आरक्षण हे आम्ही मिळवणारच. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यात येईल असे नागपूरच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते परंतु पुन्हा एकदा विद्यापीठाचे नामकरण करण्यासाठी मंत्र्यांची अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली आहे हा अहिल्यांचा अवमान केला आहे.
आम्ही भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. केवळ कर्नाटकातील येणाऱ्या निवडणुकीच्या मतांसाठी अशी समिती गठीत करून चालढकल करीत आहे धनगर आरक्षण प्रश्न व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सोलापूर विद्यापीठाला नाव हेदोन्ही प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावेत नाहीतर येणाऱ्या काळात यशवंत सेना धनगर समाजाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. आमचा गेल्या 69 वर्षाचा वनवास संपवा नाहीतर तुम्हाला 2019 च्या निवडणुकीत वनवासाला पाठविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा धनगर समाजाचे भारत सोन्नर यांनी या प्रसंगी दिला आहे याप्रसंगी रणजित खांडेकर, अशोक भावले, उमेश निर्मळ, अर्जुन कोळेकर, हरिभाऊ निर्मळ, अनिल निर्मळ, बाळासाहेब घाडगे, सुनील फाटक, बाबू उघडे, सुरेश शिंदे सुरेश हाके, मासाळ, रामनाथ यमगर, कैलास निर्मळ, ज्ञानेश्वर गर्जे, गणेश सातपुते, अशोक ढेकळे, पारखे आदी व हजारो समाज बांधव उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.