आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर धनंजय मुंडेंना दहा मिनिटे रोखले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाची टाकी फुटून झालेली दुर्घटना दुर्दैवी  असून यात पाच कामगारांचा मृत्यू होऊनही अद्यापपर्यंत साधा गुन्हाही दाखल झाला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने  या प्रशासनावर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी कारखान्याला भेट देऊन पाहणी केल्यानंतर केली आहे. दरम्यान, पोलिसांनी सुरुवातीला मुंडे यांना प्रवेशद्वारावरच रोखले होते. दहा मिनिटांनंतर मुंडे यांना कारखान्यात 

सोडण्यात आले.   


 शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता  वैद्यनाथ साखर कारखान्यावर उसाच्या रसाची टाकी फुटून १२ कामगार भाजले गेले. त्यात गंभीर असलेल्या पाच जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान,  रविवारी  धनंजय मुंडे यांनी सकाळी कारखान्यावर  जाऊन घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. या घटनेत मृत्यू  झालेल्या परळी तालुक्यातील लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगाव येथील कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी  सांत्वन केले. घटनेत मृत झालेले  कामगार हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या कुटुंबीयांना १०  लाखांची मदत द्यावी. तसेच जखमींना ५  लाख मदत देण्याची मागणीही  मुंडे यांनी  केली. कारखान्यावरील उसाचा रस टाकण्याची टाकी जुनी होती ? टाकीच्या क्षमतेपेक्षा अधिक वाफ आत सोडण्यात आली होती का? याचा शोध घेतला पाहिजे, असे धनंजय मुंडे यांनी सांगत  या दुर्घटनेस मानवी चूक कारणीभूत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे मुंडे  यांनी सांगितले. दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या टाकीत १०० डिग्रीपेक्षा अधिक उकळता रस असताना गळती आहे म्हणून टाकीला खालून वेल्डिंग करणे या बाबी संशयास्पद असल्याचेही  मुंडे म्हणाले. हा सरळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, पण चौकशी नेमकी कशी होते आणि पोलिस, कारखाना प्रशासन आणि राज्यसरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागेल. मात्र एकंदरीतच हा प्रकार दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा संशय येत असल्याचेही मुंडे यांनी नमूद केले.


दरम्यान, धनंजय मुंडे कारखान्यावर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर पोलिस निरीक्षक संपत पाळवदे यांनी मुंडे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी कारखान्याचा सभासद असल्याने मला इथे येण्याचा अधिकार असल्याचे मुंडे यांनी पाळवदे यांना सांगितले. १० मिनिटे  हा प्रकार चालल्यानंतर मुंडे यांना कारखान्यात सोडण्यात आले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पंकजा मुंडे व खासदार प्रतिम मुंडे यांनी काल जखमींची भेट घेतली त्‍याचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...