आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर रांजणाऐवजी उंबरठ्यावर पाणी टाकून वाद निवळला, महासंघ जाणार न्यायालयात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाथवाड्यातील रांजणात पाणी टाकताना नाथवंशज. छाया : ऋषिकेश तांबटकर - Divya Marathi
नाथवाड्यातील रांजणात पाणी टाकताना नाथवंशज. छाया : ऋषिकेश तांबटकर

पैठण - एकनाथ षष्ठीच्या पार्श्वभूमीवर  शनिवारी नाथवंशज रघुनाथ बुवा पालखीवाले यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नाथवाड्यातील रांजण भरण्यास सुरुवात झाली. दरम्यान, मराठा महासंघाला रांजणात पाणी टाकू देण्यास नाथवंशजांनी विरोध केल्याने काही वेळ वाद निर्माण झाला होता. मात्र, अखेर रांजणाऐवजी उंबरठ्यावर पाणी टाकूण पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला. परंतु, न्यायालयात जाणार असल्याचा इशारा मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला अाहे.


संत तुकाराम बीजेच्या दिवशी गोदावरी नदीतून कावडीने पाणी आणून टाकण्यास सुरुवात झाली. या वेळी रेखाताई कुलकर्णी, श्रीकृष्ण कुलकर्णी, उल्का पालखीवाले, माधुरी पांडव यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.  ही पूजाअर्चा झाल्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अतिश गायकवाड, संदीप तांबे, अक्षय कर्डिले आदी गोदावरी नदीतील पाणी घेऊन रांजणात पाणी टाकण्यासाठी आले होते. दरम्यान, ३५ वर्षांपूर्वी नाथवंशजाशिवाय इतराने या रांजणात पाणी टाकण्याचा वाद झाला होता. त्या वेळी इतरांनी रांजणात पाणी टाकले होते.

 

दूषित पाण्याने भरावा लागला रांजण   
यात्रेपूर्वी गोदावरीचे पात्र कोरडे केले आहे. त्यामुळे सध्या नदीपात्रात थोडे पाणी असून ते दूषित आहे आणि याच पाण्याने या पवित्र रांजणात पाणी भरण्यात येत आहे.   

 

मोठा पोलिस बंदोबस्त   
मराठा महासंघाने रांजणात पाणी भरण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे नाथवाड्यात उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलिस निरीक्षक चंदन ईमले, गणेश शर्मा आदींसह मोठा पोलिस बंदोबस्त होता.

 

हिंसक वळण लागू नये म्हणून माघार   
नाथवाड्यातील रांजणात पाणी टाकण्यास गेलो असता आम्हा नाथ भक्तांना वर्णभेदाचा फटका बसला.  नाथवंशजांनी पोलिस बळाचा वापर करून आम्हाला उंबरठ्यावर पाणी टाकायला सांगितले. परंतु, नाथषष्ठी यात्रोत्सवाला गालबोट नको म्हणून आम्ही माघार घेतली. परंतु, आम्ही न्यायासाठी न्यायालयात जाणार असल्याचे मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अतिश गायकवाड यांनी सांगितले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...