आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली: पिसाळलेल्या कुत्र्याने 15 जणांचे लचके तोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- तालुक्यातील बेलोरा येथे सोमवारी रात्री  २ च्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावात हैदोस घातला. रात्रभर ग्रामस्थांची झोप उडवून टाकणाऱ्या या कुत्र्याने गावातील १५ जणांचा चावा घेतला असून त्यातील एका महिलेसह ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.   


बेलोरा येथील ग्रामस्थ ज्ञानेश्वर ठाकरे यांनी सांगितले की, तीन महिन्यांपूर्वीही याच कुत्र्याने गावातील काही जणांवर हल्ला केला होता. परंतु सोमवारी रात्री त्याने ग्रामस्थांचे लचके तोडले. कुत्र्याच्या हल्ल्यात आनंदराव ठाकरे, भगवान गुठ्ठे, शेख रसूल, उत्तम ठोंबरे, शुभम खडसे, अशोक घुगे, जगन सानप, शंकर गुट्ठे, वैशाली खडसे, द्वारकाबाई गुठ्ठे,  पंढरी गुठ्ठे, सुधाकर घुगे, सूरज गुठ्ठे, अंजनाबाई ठाकरे, रंजनाबाई इंगोले आदी जखमी झाले असून यातील भगवान गुठ्ठे, शेख रसूल, आनंदा ठाकरे व अंजनाबाई ठाकरे हे गंभीर जखमी झाले.  त्यांच्यावर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून  त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. मंगेश टेहरे यांनी सांगितले की, सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

बातम्या आणखी आहेत...