आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नुसत्या घाेषणाच देऊ नका, श्रमदानाचे महत्त्व पटवू द्या : डाॅ. सत्यजित भटकळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाराेळा - जलसंधारणाच्या कामांमध्ये सातत्य ठेवा. वाॅटर कप स्पर्धेत सहभागी हाेऊन नुसत्या घाेषणा देऊ नका. प्रत्येक वयाेगटातील नागरिकांना श्रमदानाचे महत्व पटवून द्या. श्रमदान ही लाेकचळवळ झाली पाहिजे, असा कृतीशिल संकल्प करून कामाला लागा, असा सल्ला चित्रपट निर्माते तथा पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेचे प्रणेते डाॅ. सत्यजित भटकळ यांनी दिला.

 

पाराेळा तालुक्यातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना भेटी देऊन तहसील कार्यालयात गाव प्रतिनिधींशी साेमवारी संवाद साधताना ते बाेलत हाेते. पारोळा महसूल विभागाकडून विजयानंद शर्मा यांनी भटकर यांचे स्वागत केले. तालुका समन्वयक नीलेश राणे यांनी माहिती देताना एकूण ५० गावांनी प्रशिक्षणात सहभाग घेवून आजपर्यंत ३० गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...