आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालन्यामध्ये शंभर रुपयाच्या सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - अंबड येथील मित्राकडून १०० रुपयांच्या ६ लाख १७ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन त्या जालना बाजारात वापरात आणण्यासाठी घेऊन जाणाऱ्या शेख समीर शेख मुन्ना (२३, शारदानगर, अंबड, जि.जालना) याला पोलिसांनी गोलापांगरी येथून वाहनासह ताब्यात घेतले.

 

बहुतांश नोटांवर एकच नंबर असल्यामुळे बाजारात किती नोटा गेल्या, किती बनावट नोटा तयार केल्या हे मुख्य आरोपी पकडल्यानंतरच समोर येणार आहे. अंबडहून टाटा इंडिका (एमएच २१ एएक्स ०३२८) या कारमधून बनावट नोटा जालन्यात नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. कारच्या झडतीत डिकीत लाल बॅगमध्ये १०० रुपयांच्या ६ लाख १७ हजारांच्या नकली नोटा मिळाल्या. त्या अंबड येथील एका मित्राकडून आणल्याची कबुली आरोपीने दिली. 

 

मुख्य सूत्रधार फरार  
बनावट नोटा तयार करून त्या बाजारात पाठवण्यासाठी जवळच्या व्यक्तीच्या मार्फत त्या बाजारात नेण्याचा धंदा सुरू आहे. दरम्यान, बनावट नोटा कशा तयार करतात, त्यासाठी साहित्य कुठून आणल्या जाते, प्रशिक्षण कुठे घेतले, प्रिंटर आदी साहित्य आणण्यामागे कोण सूत्रधार आहे याबाबतचा तपास सुरू आहे. मुख्य सूत्रधार ताब्यात घेतल्यानंतरच ही माहिती उघडकीस येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...