आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारी शेतकऱ्याची नैराश्यातून आत्महत्या, मुलीच्या लग्नामुळे होते तणावात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा- तालुक्यातील नारंगवाडी येथील शेतकरी राजेंद्र छगन चव्हाण (५०) यांनी सोमवारी (दि.९) सकाळी आठ वाजता नैराश्यातून विष प्राशन केले होते, रात्री ११ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

 

राजेंद्र यांच्या नावे नारंगवाडी शिवारात सर्व्हे नंबर ५१/४ मध्ये एक हेक्टर ४१ आर शेतजमीन आहे. त्यांनी फायनान्सकडून ३.५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच नातेवाईकांकडून हात उसनी रक्कम घेतली होती. १२ मे रोजी त्यांच्या मुलीचे लग्न निश्चित झाले आहे. मुलीचे लग्न आणि फायनान्सचे कर्ज यामुळे राजेंद्र चव्हाण तणावात होते, असे समजते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. दरम्यान, राजेंद्र यांचे अन्नसुरक्षा यादीत नाव असून दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी, असा परिवार आहे. तलाठी विनायक आवारी यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल सादर केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...