आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार; हिंगोलीत दोन जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- मंगळवारी सायंकाळच्या वेळी अचानक पाऊस येऊ लागल्याने झाडाखाली थांबताच अंगावर वीज कोसळून गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. लक्ष्मण विश्वनाथ शिंदे (४०) मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 


तालुक्यातील टाकळी देशमुख येथील शेतकरी लक्ष्मण विश्वनाथ शिंदे हे मंगळवारी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना सायंकाळी सहा वाजता अचानक पाऊस सुरू झाला. तेव्हा देशमुख हे शेतातील झाडाखाली थांबले. सायंकाळी सहा वाजता झाडावर वीज कोसळून ते गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारासाठी त्यांना परळी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 


दोन जण गंभीर जखमी 
हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील सिनगी खांबा येथे शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडल्याने दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सेनगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंडित प्रल्हाद लांडगे (२७) व अमोल डिगांबर घुमणर (२१) हे दोघे बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या दोघांनाही सेनगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सेनगाव तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील कहाकर, शिनगी नागा, सिनगी खांबा आदी भागांत विजांच्या कडकडाटात पाऊस पडला असून त्यामध्येच वीज पडून दोघे गंभीर झाल्याची ही घटना घडली आहे.

बातम्या आणखी आहेत...