आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याची अंधापुरीत गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- कपाशीवर पडलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी संकटात सापडला असून दुष्काळ, नापिकीच्या जोडीला बोंडअळीही शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. कपाशीला भरपूर खर्च केला, पण उत्पन्न नाही लोकांचं देणं वाढलंय ते कसे परत करायचं अशी चिठ्ठी लिहून ठेवत अंधापुरीत (ता. बीड) ६० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन मरणाला कवटाटले.     


बीड जिल्ह्यात १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या कपाशीवर बोंडअळीने हल्ला चढवलेला आहे. यामुळे कपाशीचे उत्पन्न निम्म्याने घटणार आहे. मोठ्या आशेवर कपाशीला खर्च करुन काळजी घेऊन चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना बोंडअळीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे. हे अपेक्षाभंगाचे दु:ख पचवताना शेतकरी पुन्हा मरणयात्रा करत असल्याचे दिसून येत आहे. बीड तालुक्यातील अंधापुरी येथील विठ्ठल सोनबा जगताप (६०) हे अल्पभूधारक शेतकरी अवघ्या दोन एकर शेतीत आर्थिक अडचणींचा सामना करून त्यांनी कपाशीचे पीक लावले होते. पत्नीच्या निधनानंतर दोन मुले, सुनांच्या मदतीने कधी मजुरी करुन तर कधी स्वत:च्या शेतात कष्ट करुन ते कुटुंब चालवत होते. यंदाही दोन एकरांवर त्यांनी कपाशी लावली, पीकही चांगले अाल्याने चांगल्या उत्पन्नाची आशा होती. कपाशीच्या संगोपनासाठी हाती पैसे होते तर बियाणे खरेदी, फवारणी यासाठी त्यांनी काही पैसे हातउसने घेतलेले हाेते तर काही पैसे पहिलेच घेतलेले होते. परंतु कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. 

 

चिठ्ठी सापडली   
विठ्ठल यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती पोलिसांनी हस्तगत केली. ‘कपाशीवर खूप खर्च केला, पण उत्पन्न मिळाले नाही. लोकांचे देेणे वाढले आहे ते कसे परत करणार म्हणून आत्महत्या करताेय,’ अशी चार ओळींची ही चिठ्ठी असल्याचे नेकनूर पोलिसांनी सांगितले.    

 

बातम्या आणखी आहेत...