सरण रचले, विष / सरण रचले, विष पिले, नंतर त्‍यावर जाळून घेत आत्महत्या; कर्जमाफीत नाव न आल्‍याने शेतक-याचे टोकाचे पाऊल

दिव्‍य मराठी वेब टीम

Jul 31,2018 12:24:00 PM IST

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) - कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्यामुळे पुन्हा पीक कर्ज मिळाले नाही. परिणामी आलेले आर्थिक संकट व प्रपंच चालवणे कठीण झाले. या नैराश्यातून सावखेड तेजन येथील गजानन अर्जुन जायभाये (३९) या शेतकऱ्याने स्वत:च्या हाताने सरण रचत त्यावर जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना २९ जुलैला सकाळी उघडकीस आली. गजाननने शेतात येऊन स्वतःसाठी सरण रचले, त्याला आग लावली. त्यानंतर विषारी औषध प्राशन करत त्यावर झोपला व बेशुद्धावस्थेतच जाळल्या गेला असावा, असा कयास आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

जायभायेंना ३ एकर शेती आहे. गतवर्षी महाराष्ट्र बँकेचे ७० हजारांचे पीक कर्ज घेतले होते. कर्जमाफी यादीत नाव नसल्याने नवे पीक कर्ज मंजूर झाले नाही. पेरणीसाठी उसनवारी करत बी बियाणे, खताची जुळवाजुळव त्यांनी केली. परंतु, शेतीत सततची नापिकी, कर्ज, संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न त्यांना सतावत होता.

X
COMMENT