आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलताबादेत पाण्यासाठी उपोषण, आश्वासनानंतर मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - शहरात सुरू असलेली विकासकामे थांबवून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, या मागणीसाठी निसार पठाण, मसिओद्दीन शुतारी, कलीमोद्दीन कुदबोद्दीन आदींनी नगरपालिकेसमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले होते ते मंगळवारी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

 

दिव्य मराठीने खुलताबाद शहराच्या पाण्याचा प्रश्न सचित्र वृत्ताच्या माध्यमातून प्रकाशित करत वारंवार पाठपुरावा करून प्रशासनाचे नाही तर स्वयंसेवी संस्थांनी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे, तर याच दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शहरासाठी टँकर मंजूर केले असून लवकरच शासकीय टँकरने पुरवठा सुरू होणार आहे. पालिकेने कायमस्वरूपी पुरवठ्याची सोय करावी, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. उपोषणाला भारिप बहुजन महासंघासह महिलांनी पाठिंबा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...