आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेसाठी अंगठी मोडली, साहित्य संमेलनात 2 अंगठ्या देऊन शिक्षकाचा सत्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देटेवाडी येथील एक खोली व एकशिक्षकी जिल्हा परिषद प्रा. शाळेचे शिक्षक रवींंद्र गायकवाड यांनी शाळेची दुरुस्ती व विद्यार्थ्यांना ‘ई- लर्निंग’ सुविधा देण्यासाठी ‘जीपीएफ’मधून ३५ हजारांचे कर्ज काढले. रक्कम कमी पडली म्हणून स्वत:ची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठीही मोडली. या ध्येयवेड्या शिक्षकाचा साहित्य संमेलनात नवीन कपडे, सोन्याच्या ५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या देत पालकमंत्री पंकजा मुंडे व मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार व गौरव करण्यात आला.


३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद््घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, मंत्री पंकजा मुंडे, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री सुरेश धस, रमेश आडसकर, आमदार संगीता ठोंबरे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांच्यासह ९० व्या माजी संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे अादींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...