आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीवरून कमी केल्याने उस्मानाबादेत सुरक्षा रक्षकाकडून कॅशव्हॅनवर गोळीबार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - नोकरीवरून कमी केल्याचा राग मनात धरून कॅशव्हॅनवर सुरक्षा रक्षक असलेल्या बाजीराव कदम याने रस्त्यावरील कॅशव्हॅनवर गोळीबार केला. गुरुवारी (दि.१७) सकाळी १०.३० वाजता घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या गोळीबाराने कॅशव्हॅनच्या पुढील उजव्या बाजूच्या चाकावर गोळी लागली, त्यामुळे टायर फुुटून मोठा आवाज झाला. ही घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील महाराष्ट्र ग्रामीण बँकेजवळ घडली.


महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे कोल्हापूरच्या युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरिटी या कंपनीची कॅशव्हॅन भाडेतत्त्वावर आहे. सदरील कॅशव्हॅनवर हनुमंत रडेकर(रा. झाडे गल्ली) चालक म्हणून तर आबासाहेब काकडे-लीडर व बाजीराव सुभाष कदम (रा. टीपीएस रोड), रामेश्वर भोसले (रा. बालाजीनगर) हे दोन सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. १५ मे रोजी कंपनीच्या सुपरवायझरने केलेल्या पाहणीत सुरक्षा रक्षक बाजीराम कदम गैरहजर होते. ते सतत कर्तव्यावरही दारू पित असल्याने सुपरवायझरनी त्यांना मेमो देऊन कामावरून कमी केले होते. याचा राग मनात धरून १६ मे रोजी कदम यांनी बँकेत येऊन कॅशव्हॅनवरील कर्मचाऱ्यांना धमकावले होते. 


तक्रार केल्याचा राग

सहकाऱ्यांच्या तक्रारीवरून कंपनीने आपल्याला कामावरून कमी केले, असा समज झाल्याने सुरक्षारक्षक कदम यांनी कॅशव्हॅनवर गोळीबार केला. 


दारूच्या नशेत कृत्य

बाजीराव कदम ४ दिवसांपासून दारूच्या नशेत होते. त्यांनी गुरुवारी हा प्रकार नशेतच केल्याचे कर्मचाऱ्यांची सांगितले.

 

नागरिकांची धावपळ, दुकानेही बंद
कदम यांनी बंदुकीतून गोळी झाडातच मोठा आवाज झाला. यामुळे भीतीपोटी परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. परिसरातील व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने भीतीपोटी बंद केली.मात्र त्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तसेच सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

 

बातम्या आणखी आहेत...