आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॉकलेटचे आमिष दाखवून केला पाच वर्षीय मुलीवर बलात्कार; आरोपी पाेलिसांच्‍या ताब्‍यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- चॉकलेटचे आमिष दाखवत पाच वर्षीय  मुलीवर बलात्कार झाल्याची घटना जालना शहरातील मोतीबाग परिसरात मंगळवारी रात्री घडली. 


प्राथमिक उपचारांनंतर मुलीस घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले अाहे. याप्रकरणी पोलिसांनी विनोद पैठणकर (२०, अशोकनगर) याला ताब्यात घेतले. विनोदने त्याच्या दुचाकीवर मुलीला मोतीबाग परिसरात नेऊन अत्याचार केला. काही वेळाने तिला घरी आणून सोडले. मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्याने पालकांनी तिला रुग्णालयात नेले. अतिदक्षता विभागात भूलतज्ज्ञ नसल्याने तिला घाटीत दाखल केले आहे. सध्या तिची प्रकृती चांगली असल्याचे महिला व बाल रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली पंडित यांनी सांगितले. रक्ताचे नमुने, इतर माहिती न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवली आहे. 

बातम्या आणखी आहेत...