आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली: एसटी बसचालक, वाहकास चोर समजून चार जणांनी केली बेदम मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - तालुक्यातील सावरगाव बंगला येथे शनिवारी रात्री ९ वाजता शौचविधीसाठी  गेलेल्या एसटी बस चालक आणि वाहकाला चोर समजून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत रविवारी बासंबा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हिंगोली येथील बस आगाराची बसगाडी (एम एच ६- एस ८७९३) सावरगाव बंगला येथे शनिवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास मुक्कामी गेली होती. बसचे वाहक गजानन तुकाराम क्षीरसागर व चालक बाळू रामराव सोनार हे दोघे शौचविधीसाठी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावाच्या बाहेर मोकळ्या मैदानात गेले होते. परंतु या वेळी गावातील अशोक सोनटक्के व त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी, चोरटे समजून गजानन क्षीरसागर व बाळू सोनार यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत असल्याने वाहक क्षीरसागर आणि चालक सोनार यांनी आरडाओरड केली. त्यामुळे ग्रामस्थ जागे होऊन घटनास्थळी दाखल झाले. काही ग्रामस्थांनी सामंजस्याची भूमिका घेत दोघांची विचारपूस केली.   नंतर दोघांनाही प्रकाशात आणण्यात असता ते दोघेही चोर नसल्याचे स्पष्ट झाले.   ते बसचे वाहक आणि चालकच निघाल्यामुळे आणि इतर ग्रामस्थांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळला.  बसचालक आणि वाहकाला मारहाण करणारे चौघेही फरार झाले. 

 

चालक रुग्णालयात 
दोघेही रात्रभर बसमध्येच झोपल्यानंतर चालक बाळू सोनार यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वाहक गजानन क्षीरसागर यांनी बासंबा पोलिस ठाण्यात जाऊन अशोक सोनटक्के यांच्यासह इतर तीन जणांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...