आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध उत्पादकांचे 3 मेपासून मोफत दूध वाटप आंदोलन, लाखगंगा ग्रामसभेत ठराव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - दूध दरामध्ये सातत्याने घट होत असल्याने दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांसाठी हातबट्ट्याचा ठरत आहे. शासनाकडून दूध दरवाढ करण्याच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने येत्या ३ मेपासून खेड्यापाड्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी मोफत दूध वाटप आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदवावा, असा एकमुखी ठराव लाखगंगा येथे शनिवारी दूध दरवाढीप्रश्नी पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला.   


शेतकरी नेते अजित नवले, धनंजय धोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच दिगंबर तुरकणे होते. तालुक्यातील गोदावरीकाठाचे ८० टक्के शेतकरी हे दूध धंद्यावर अवलंबून असून गेल्या महिनाभरापासून दूध दरामध्ये सातत्याने घट होत असल्याने यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. विशेष ग्रामसभेत सततच्या दूध दरामध्ये होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करून ३ मेपासून गावातील व तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपले दूध तहसील व जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन मोफत दूध वाटप करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, शिवसेनेचे रमेश सावंत, अॅड. प्रताप धोर्डे,  तालुक्यातील व नगर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे म्हणाले की, दूध दरामध्ये होणाऱ्या घसरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून यामुळेच येत्या ३ मे पासून राज्यातील सर्व दूध उत्पादक आपले दूध फुकट देणार अाहेत.

 

प्रतिलिटर सहा रुपये अनुदान द्यावे
शासनाने आगामी वर्षात दुध उत्पादक शेतक ऱ्यांना प्रतिलिटर ६ रुपये अनुदान द्यावे असा ठराव जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी मांडला आहे. तो मंजूर करावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...