आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना‍ न्याय न मिळाल्यास अंबानींच्या घरावर मोर्चा : खासदार राजू शेट्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाई करण्याऐवजी तांत्रिक मुद्दे काढून आंदोलन करणा‍ऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत़ रिलायन्स कंपनीला शासन एवढे पाठीशी का घालीत आहे. येत्या आठ दिवसांत परभणीतील पीकविमा प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास अंबानींच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला आहे. 


पीक विम्यापासून वंचित जिल्ह्यातील शेतक‍ऱ्यांनी रिलायन्स पीकविमा कंपनीविरूद्ध १३ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. खा.शेट्टी म्हणाले, कृषी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांंच्या सहाय्याने शेतकऱ्यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. परंतु विमा परतावा न देणाऱ्या अनिल अंबानी यांनी शेतकऱ्यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे. 


पीकविमा संदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या असून पुराव्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही नोंदविली आहे. परंतु शासन रिलायन्स कंपनीसमोर झुकत आहे. देश कार्पोरेट कंपन्यांना गहाण ठेवण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. देशभरातून ९ हजार ४१ कोटी रुपये रिलायन्स कंपनीने विम्यापोटी जमा केले. परतावा मात्र केवळ ८१२ कोटी रुपयांचाच दिला आहे. त्यामुळे सदरील पीक विमा योजना अंबानी कल्याण योजना असल्याचे शेट्टी म्हणाले. यावेळी कॉ़ राजन क्षीरसागर, जि.प. सदस्य श्रीनिवास जोगदंड, स्वाभिमानी संघटनेचे माणिक कदम, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे आदींची उपस्थिती होती. 

बातम्या आणखी आहेत...