आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींना विवस्त्र करून मोबाइलवर दाखवले अश्लील फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी- मोबाईल इंटरनेटवरील अश्लील फोटो दाखवत मागील एक वर्षापासून चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वडवणी तालुक्यातील ढोरवाडी जिल्हा परिषद शाळेत घडली असून आरोपी मुख्याध्यापकाविरोधात काल (रविवार) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


सूत्रानुसार, तालुक्यातील ढोरवाडी येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. येथे दिंगाबर सुधाकर शिंदे (रा.केसापुरी परभणी ता. बीड ) मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. 8 डिसेंबर 2017 रोजी दुपारी तीन वाजता दिगंबर याने शाळेतील चौथीच्या वर्गातील तीन व तिसरीच्या वर्गातील एका मुलीला अशा चार विद्यार्थिनींना बरोबर घेवून शाळेतील एका वेगळ्या खोलीत गेला होता. खोलीचा दरवाजा बंद करून त्याने मुलींना विवस्त्र करून त्यांना मोबाइलवर अश्लील फोटो दाखवले. विद्यार्थिनींनी आरडाओरड करू नये म्हणून त्यांना धमकावले होते. शाळा सुटल्यांनतर मुली घरी गेल्या त्यातील एका मुलीने शाळेत घडलेला प्रकार तिच्या आज‍ीला सांगितला. आजी- आजोबा मिळून तिसरीत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थिनींकडे गेले. तेव्हा तीनही असाच प्रकार घडल्याचे सांगितले. दरम्यान सरपंच बद्रीनाथ व्हरकटे यांनाही हा प्रकार कळाला त्यांनी मुलीच्या आजोबाला बरेाबर घेवून वडवणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार मुख्याध्यापक दिगांबर शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून तपास वडवणी पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...