आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली : दोन दुचाकीच्या अपघातात 2 जागीच ठार, 2 गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - तालुक्यातील जोडतळा पाटीवर बुधवारी सकाळी १२ च्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यात दोन जागीच ठार तर दोन जन गंभीर जखमी झाले. यातील जखमींवर प्राथमिक उपचार चालू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार एका दुचाकीवरून दोघे जन शाळेतील काम आटोपून हिंगोलीकडे परत येत होते. तर दुसरे दोघेजन मोटारसायकलने हिंगोलीवरून सिरसमकडे जात असताना माळहीवरा पाटीवर हा अपघात घडला.


हा अपघात एवढा जबरदस्त होता की दोन्ही दुचाकींची चाके उखडून पडली.  शिवाय दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात झाला तेंव्हा घटनास्थळी गर्दी जमली होती. तातडीने चौघांनाही हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.


या अपघातातील सिद्धार्थ इंगोले, शेख अमीन हे जागीच ठार झाले. तर शेख रमजान व  वडदकर नावाच्या व्यक्तीला हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  अपघातात ठार झालेल्या दोघांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...