आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिकेत काेथळेच्या मुलीची हिंगोलीच्या महिला पाेलिसाने स्वीकारली जबाबदारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगाेली- सांगलीतील पाेलिस काेठडीत असताना पाेलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेला संशयित अनिकेत काेथळेच्या मुलीचे पालकत्व स्वीकारण्यासाठी हिंगाेलीच्या महिला पाेलिस  उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी पुढाकार घेतला अाहे. सदर मुलीचा संपूर्ण खर्च पाटील करणार अाहेत.  


सांगली पोलिसांच्या कोठडीत असताना झालेल्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणाने पोलिसांवर चौफेर टीकेची झोड उठली. तसेच अनिकेतच्या आर्थिक परिस्थितीवरही प्रकाश टाकण्यात आला होता. पोलिसांच्याच मारहाणीत मृत्यू पावलेल्या अनिकेतच्या मुलीच्या मदतीला पोलिस दलातच कार्यरत असलेल्या एक महिला अधिकारी धावून गेल्या. उपअधीक्षक सुजाता आबासाहेब पाटील यांनी १६ नोव्हेंबर  रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना पत्र पाठवून अनिकेतच्या लहान मुलीचे पालकत्व घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या विनंतीला नांगरे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अाहे. सुजाता पाटील यांचे पती आबासाहेब पाटील यांनी स्वतः सांगली येथे जाऊन काेथळे कुटुंबीयांची भेट घेऊन सदर मुलीचे पालकत्व स्वीकारले. सदर मुलगी बालपणात तिच्या आईकडेच राहणार असून तिचा सर्व खर्च सुजाता पाटील करणार आहेत. ही मुलगी मोठी झाल्यावरही तिचे शिक्षण ते लग्न हे सर्व पाटील कुटुंबीयच करणार आहेत.   

 

लग्नापर्यंत सर्व खर्च करणार   
कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षकांना पत्र पाठविल्यावर त्यांनी अनिकेतच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांनी संमती दिल्यावर महानिरीक्षकांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे कळविले. त्यानंतर पती आबासाहेब पाटील यांना पाठवून मुलगी पाहण्यास सांगितले. तसेच पुढील प्रक्रिया पूर्ण केल्या. अाता सदर मुलीच्या लग्नापर्यंतचा संपूर्ण खर्च आम्हीच करणार असून तिचा मुलीसारखाच सांभाळ करू.  
- सुजाता पाटील, पाेलिस उपअधीक्षक, हिंगोली.  

 

अनिकेतच्या मृत्यूनंतर पती-मुलगी आधारहीन...
सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेतचा मृत्यू झाला होता. इतकेच नाही तर पुरावा लपवण्यासाठी पोलिसांनी अनिकेतच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाटही लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अवघ्या दोनच दिवसांत 'सत्य' बाहेर आले होते. याप्रकरणी पोलिसांची खाकी मलीन झाली होती.

 

अनिकेतच्या पश्चात त्याची पत्नी आणि तीन वर्षाची प्रांजल आधारहीन झाल्या आहेत. पोलिस विभागात खऱ्या अर्थाने आज सुजाता पाटील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज निर्माण झाली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... या घटनेशी संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...