आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कर्ज फेडता येत नसेल तर आत्महत्या करण्यापेक्षा कर्ज बुडवायला शिका’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदबाजार- बँका, खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी इच्छा असतानाही निसर्गाच्या लहरीपणामुळे फेडू शकत नसाल तर ते बुडवायला शिका, पण आत्महत्येचा विचार मनात आणू नका, अशी भावनिक साद प्रसिध्द इतिहास संशोधक प्रा. अमोल मिटकरी यांनी वडोद बाजार येथील जाहीर सभेत बोलताना घातली. 

 

वडोद बाजार परिसरातील १२ गावांमध्ये संभाजी ब्रिगेड गाव शाखेच्या स्थापनेनिमित्ताने वडोद बाजार येथे जाहीर सभेचे अायोजन केले होते. त्याप्रसंगी प्रा. मिटकरी बोलत होते.  ते म्हणाले की, शिवसेना हा लाचार पक्ष आहे. शेतकरी हतबल आहे. मोर्चे निघताहेत, पण उध्दव सत्तेसाठी भाजपला चिटकून आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर आजपर्यंत सत्तेला लाथ मारली असती. ललित मोदीने ११ हजार कोटी बुडवले,  विजय मल्ल्याने ८ हजार कोटी बुडवले. त्यांच्यावर कार्यवाही करा, मग आमच्यावरही कार्यवाही करा, असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...