आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजमध्ये उत्तरपत्रिका जळाल्या; मात्र पुन्हा परीक्षा नाही : बोर्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केज तालुक्यातील केंद्रात दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या असल्या तरी या विषयांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एस. एम. काळे यांनी सांगितले. मात्र,  परीक्षा समितीची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. दहावी-बारावी बोर्डाच्या सध्या लेखी परीक्षा सध्या सुरू आहेत. शनिवारी रात्री येथे गट साधन केंद्रातील रूममध्ये ठेवलेल्या उत्तरपत्रिकांना आग लागली. यात बारावी गणिताच्या सुमारे १२०० व उर्दू माध्यमाच्या सुमारे सव्वाशे उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या.

निलंबनाच्या नोटिसा
गटशिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधित १५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसात महत्त्वाच्या परीक्षेत अक्षम्य दुर्लक्ष व दिरंगाई केल्याचे म्हटले असून  ही खूपच गंभीर बाब असल्याचे नमूद करून सूचनांचे व्यवस्थित पालन न करणे व कर्तव्य व्यवस्थित पार न पाडणे यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पंचनामा
तहसीलदार अविनाश कांबळे यांनी रविवारी दुपारी  गटसाधन केंद्रास भेट देऊन उत्तरपत्रिका जळालेल्या रूमची पाहणी केली. त्यानंतर मंडळ अधिकारी भागवत पवार व तलाठी दराडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जवाब घेतले.

लाखेमुळे आग ?
दरम्यान,  गटसाधन केंद्राचा वीजपुरवठा खंडित होऊन काही महिने झाले आहेत. त्यामुळे शॉर्ट सर्किटने आग लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे नेमकी आग लागली तर कशामुळे अथवा ती लावली गेली का हे प्रश्न आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार उत्तरपत्रिका सील करण्यासाठी लाख वापरतात ती गरम करून मग सील केले जाते. यातील लाखेचा निखारा असलेला तुकडा पडून आग लागण्याची प्राथमिक शक्यता आहे.

निलंबनाच्या नोटिसा
गटशिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधित १५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसात महत्त्वाच्या परीक्षेत अक्षम्य दुर्लक्ष व दिरंगाई केल्याचे म्हटले असून  ही खूपच गंभीर बाब असल्याचे नमूद करून सूचनांचे व्यवस्थित पालन न करणे व कर्तव्य व्यवस्थित पार न पाडणे यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...