आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेचा ताण सहन न झाल्याने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, नांदेडमधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- परीक्षेचा ताण सहन न झाल्याने बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील व सध्या शाहूनगर येथे राहणारी ऋतुजा प्रतापराव देशमुख ही बारावीची परीक्षा देत होती. परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने व परीक्षेचा ताण सहन न झाल्याने तिने शनिवारी रात्री घरातील पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सतीश दिगंबर देशमुख यांनी दिलेल्या माहितीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...