आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायको घरातून निघून गेली अन् रागाच्या भरात नवऱ्याने केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- बायकाे घरातून निघून गेल्याच्या कारणावरून रागाच्या भरात स्वत:चे घर पेट्रोल टाकून जाळले. दरम्यान, शेजारच्या दोन घरांनाही आग लागून तीन घरांचे नुकसान झाल्याची घटना बदनापूर तालुक्यातील भातखेडा येथे मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. 


रामेश्वर शामराव गाढेकर व त्यांची पत्नी यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. या वादामुळे त्यांची पत्नी घरातून निघून गेल्याच्या कारणावरून रामेश्वर यांनी रागाच्या भरात स्वत:चे घर पेट्रोल टाकून जाळले. या आगीने रौद्ररूप धारण करत शेजारी असलेल्या दोन्ही घरांना आग लागली. सुदैवाने घरांतील सर्वजण तातडीने बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या आगीत शेजारील दोन्ही घरातील धान्य, पत्रे आदी साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी बबन काकाजी गाडेकर यांच्या फिर्यादीवरून बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रामेश्वर गाढेकरला ताब्यात घेतल्याची माहिती तपासिक सपोनि जगदाळे यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...