आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती, सासू-सासऱ्यांनीच विवाहितेसह मुलांना मारले; आई व मुली पाठोपाठ मुलाचाही मृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथील विषप्रयोग प्रकरणातील आई व मुलीच्या मृत्यू पाठोपाठ तीन वर्षीय मुलाचाही बुधवारी (दि.२४) उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात पती व सासू सासऱ्यानेच विष देऊन तिघांना जिवे मारल्याची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी दिल्यावरून सोनपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यास अटक केली आहे.


गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथील पद्मीनबाई ऊर्फ लक्ष्मी भगवान कऱ्हाळे या विवाहितेसह तिची मुलगी संध्या (वय ६) यांचा विषाने मंगळवारी (दि.२३) अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर मुलगा अगस्थी (वय ३) हा विषाने अत्यवस्थ अवस्थेत उपचार घेत होता. त्याचाही बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात विष दिले की विवाहितेने स्वत: विष प्राशन करून मुलांनाही दिले याबाबत  पोलिस कोणताही निष्कर्ष काढू शकत नव्हते. मात्र, कौटुंबिक वादातूनच हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा कयास होता.


दरम्यान, बुधवारी उपचार घेत असलेल्या मुलाच्या मृत्यूनंतर पद्मीनबाई हिचे वडील अर्जुन बळीराम जाधव (वय ५५, रा.पोहंडुळ, ता.सोनपेठ) यांनी सोनपेठ पोलिसांत  फिर्यादी दिली. त्यात त्यांनी मुलगी पद्मीनबाई हिचा पती भगवान जगन्नाथ कऱ्हाळे, सासरा जगन्नाथ भानुदास 
कऱ्हाळे (वय ६५), सासू निलावंती जगन्नाथ कर्हाळे (वय ६०) या तिघांनी मागील काही दिवसांपासून छळ चालवला होता. ही मंडळी तिच्याकडे घर खर्चासाठी व शेतीसाठी माहेराहून १ लाख ६५ हजार रुपये आणण्याची मागणी करीत होती. त्यासाठी तिला सातत्याने मारहाण करण्याचे प्रकार करीत होती. याच प्रकारातून या तिघांनी सोमवारी (दि.२२) रात्री साडेसात ते आठच्या सुमारास  पद्मीनबाई, नातू संध्या व अगस्थी या तिघांना विष पाजले . त्यातच या तिघांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

 

खुनाचा गुन्हा नोंदवला
जाधव यांच्या तक्रारीवरून सोनपेठ पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक सोपान सिरसाठ हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...