आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 दिवसांत टोमॅटोचे दर 70 वरून 20 रुपये किलो; कांद्याच्या दरातही किंचित घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- शहरातील बाजार पेठेमध्ये भाजीपाल्यांचे दर उतरणीला लागले आहेत. गेल्या १५ दिवसांपूर्वीच ७० रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो आता २० रुपयाने मिळत आहेत. कधी नव्हे ते शंभर रुपयांवर गेलेला वांग्यांचा दर गडगडून थेट १० रुपयांवर आला आहे. अन्य भाजीपाला  घसरल्याने बाजारात गर्दी वाढू लागली आहे.


गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या चढ उतारामुळे चर्चेत आलेला टोमॅटो पुन्हा दर उतरल्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वीच टोमॅटो ६० ते ७० रुपयांनी विकले जात होते. मात्र, गुरुवारी ते शनिवारी दर घसरून २० रुपये किलोवर आला आहे.वांग्याचे दरात काही दिवसांपासून चढउतार असून मागील आठवड्यातच १०० रुपये किलोने विकले जाणारे वांगे थेट १० रुपयांवर आले. काही व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून याच दरम्यानच्या दरात टोमॅटो व वांग्यांची खरेदी केली होती. दर उतरल्यामुळे त्यांनाही काहीसा फटका समजते.


कांदा किंचित उतरला

गेल्या काही दिवसांपासून ६० रुपये दराने विकला जाणारा कांदा शुक्रवारी ३० ते ४० रुपये दराने विकला गेला. अन्य भाजीपालाही बऱ्यापैकी आवाक्यात आला आहे. मेथी, कोथिंबीर, पालक आदी पालेभाज्याही १५ वरुन तीन रुपये प्रती जुडीने विकल्या जात आहेत. सर्वसामान्यांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र, मोठा फटका बसला आहे.


स्थानिक आवक वाढली

सर्व भाजीपाला उत्पादकांचा माल आता बाजारात येत आहे. सोलापूरच्या बाजार समितीतील सौद्याला व्यापारी उपस्थिती लावत आहेत. परिणामी दरात घट झाली. यापुढेही मालाची आवक वाढणार आहे. परिणाम दरात आणखी घट होणे अपेक्षित आहे. 

 

उत्पादन वाढले
टोमॅटोसह अन्य भाजीपाल्याचे उत्पादन उस्मानाबाद जिल्ह्यात वाढले. यामुळे दरात घट होत आहे. दराच्या बाबतीत व्यापाऱ्यांचाही अंदाज चुकला.
-प्रदीप सावंत, भाजीपाला विक्रेते.

बातम्या आणखी आहेत...