आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या वादातून युवकाचा खून, जमावाचा आक्रोश, रस्त्यावर ठिय्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- शहरातील सिद्धार्थनगर येथील युवकाच्या खूनप्रकरणी मुख्य आरोपींना तातडीने अटक करून द्रुतगती न्यायालयात खटला चालवून फाशीच्या शिक्षा देण्याच्या मागणीसाठी जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा विराेध झुंगारत मृतदेह नेला. सुमारे तीन तास यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्यासंख्येने महिलांनीही रस्त्यावरच ठिय्या मारला. अखेर जमावाच्या आक्रोशामुळे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी कारवाई सुरू केल्याचे सांगताच जमावाने माघार घेतली. 


क्रिकेटमध्ये हरवलेल्या संघाकडून २०० रुपये मागण्यासाठी गेलेल्या ११ युवकांनी मारहाण केल्यामुळे शहरतील सिद्धार्थनगर (सांजारोड) येथील युवक आकाश गंगावणे गंभीर जखमी झाला. हा प्रकार मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ७.३० वाजता घडला. नंतर सोलापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. आंनदनगर येथील पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, यामध्ये मुख्य आरोपी व त्याला पाठबळ अन्य युवकांना अटक केले नसल्याचे नातेवाइकांसह शहरात अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना समजले. 

 

मृतदेह शहरात आणण्याअगोदरच मोठ्याप्रमाणात महिलांसह जमाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चालून आला. जमावातील युवक व महिला आक्रोश करत १.१५ वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरील महामार्गावर ठिय्या मारून बसले. 

 

बातम्या आणखी आहेत...