आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र पोलिस ठाणे, रेल्वे गेटवर उड्डाणपूल लवकरच; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूर स्टेशन- लासूर स्टेशनला स्वतंत्र पोलिस ठाणे, रेल्वे गेटवर उड्डाणपूल लवकरच उभारण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. लासूर स्टेशन येथे जानकी देवी बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून गंगापूर तालुक्यातील १०८ गावांत २६२ कोटींच्या जलसंधारणाच्या कामे करण्यात येणार आहे. रांजणगाव पोळ येथील लघु प्रकल्पातील गाळ काढण्याचा कामाने या विविध कामांचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

 

या वेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बजाज कंपनीचे व्हॉइस चेअरमन मधुर बजाज, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर, आमदार प्रशांत बंब, अतुल सावे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गंगापूर तालुक्यात सुमारे पंचवीस हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारी ब्रह्मगव्हाण जल उपसा सिंचन योजना राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. तर बजाज कंपनीचे व्हॉइस चेअरमन मधुर बजाज म्हणाले,  बजाज फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून करण्यात येणाऱ्या कामातून या प्रकल्पातील एक लाख ५० हजार घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. काढलेला गाळ १२५ पंचवीस एकर क्षेत्रावर पसरवला जाणार असल्याने जमिनीची सुपिकता वाढणार आहे.

 

या कामावर एकूण ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी १२ पोकलेन २ जेसीबी, ५१ टिप्पर असणार असल्याचे सांगितले.  जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी यांनी प्रास्ताविकातून बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या जलसंधारणाच्या, महिला व युवकांच्या सशक्तीकरणाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. दरम्यान, गेल्या डिसेंबर महिन्यात महाआरोग्य शिबिरात आजाराचे निदान झालेल्या अनेक रुग्णांपैकी एक हजार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून येत्या काही महिन्यांत उर्वरित सर्व रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली. 

   
या वेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, सुनील लांजेवार, पंचायत समिती सभापती ज्योती गायकवाड, उपसभापती संपत छाजेड, तालुका प्रमुख दिनेश मुथा, सावळीराम थोरात, तहसीलदार चंद्रकांत शेळके, डाॅ. बन्सीलाल बंब, सुरेश जाधव, नारायण वाकळे, मदनलाल लोढा, दिलीप पवार, रज्जाक पठाण, रवि चव्हाण, पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे, उपसरपंच नितीन कऱ्हाळे, पांडुरंग कुकलारे, नगरसेवक प्रदीप पाटील, मारुती खैरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.   सूत्रसंचालन व आभार आमदार बंब यांनी  मानले. 

बातम्या आणखी आहेत...