आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले, स्थानिक आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आता वातावरण चांगलेच तापू लागले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारपासून परळीच्या धर्तीवर ठिय्या मोर्चा आंदोलन सुरु करण्यात आले.

 

मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यत आंदोलन सुरुच ठे‌वण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. शुक्रवारी हे अांदोलन अधिक तीव्र करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी पुतळा चौकात स्थानिक आमदारांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. आमदार हेमंत पाटील, डी.पी.सावंत, वसंत चव्हाण, नागेश पाटील आष्टीकर, राम पाटील रातोळीकर  आदि आमदारांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या नंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन मराठा आरक्षणाची मागणी केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...मराठा कार्यकर्त्यानी केेलेल्या आंदोलनाचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...