आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • ATM फोडणे यू ट्यूबवरून शिकले..झटपट श्रीमंत होण्याचा फंडा विशीतल्या तरुणांच्या अंगलट Bank ATM Robbery In Beed, Five Accused Arrested By Police

ATM फोडणे यू ट्यूबवरून शिकले..झटपट श्रीमंत होण्याचा फंडा विशीतल्या तरुणांच्या अंगलट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- गुरुवारी (ता.7) पहाटे दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर आता या टोळीचे इतर कारनामेही समोर आले आहेत. टोळीतील सर्व पाचही 20 ते 25 वयोगटातील आहेत. यू ट्यूबवरून या युवकांनी एटीएम कसे फोडायचे याची माहिती जमवली, व्हिडिओ पाहिले आणि दोन महिन्यांत तीन वेळा एटीएम तर एक वेळा थेट बँक फोडण्याचा प्रयत्न केला. आरोपींची तयारी पाहून पोलिसही थक्क झाले.  


झटपट श्रीमंत होण्याच्या नादात थेट गुन्हेगारीकडे वळलेली तरुणाई गेल्या काही घटनांमधून दिसून येत आहे. गुरुवारी पहाटे तर बीडमध्ये प्रयत्न फसल्यानंतर थेट राजुरीचे एटीएम मशीनच उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी विशाल राख, बाळू मुंडे व जीवन पवार या तिघांना अटक केली, तर मास्टरमाइंड असलेल्या आरोपीसह अन्य एक फरार आहे. दरम्यान, या तरुणांनी एटीएम फोडण्याचे तंत्र कुठे शिकले याची चौकशी केली असता फरार असलेल्या मास्टर माइंडने यू ट्यूबवरून एटीएम कसे फोडायचे याचे व्हिडिऔ पाहिले, त्यासाठी काय काय साहित्य लागते याची माहिती घेतली. त्यानुसार साहित्य जमा केले. मग त्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारायच्या रंगाच्या स्प्रेपासून ते गॅस कटर, बोटांचे ठसे मिळू नयेत म्हणून ग्लोव्हज, हातोडी व एटीएम तोडण्यासाठी आवश्यक इतर साहित्य घेतले. दोन महिन्यांपूर्वी राजुरी येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.  त्यांनी त्यावर दगड घातले. पण एटीएम फुटले नाही. हा प्रयत्न फसल्यानंतर काही दिवस थांबून पुन्हा तयारी करून या टोळीने आठवडाभरापूर्वी खालापुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथेही ते अयशस्वी झाले. अनुभवी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बँकेची तिजोरी तीन ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न झाला, मात्र ती फुटली नाही. या प्रयत्नात बहुतेक गॅस कटरचा गॅस संपला अन् हे चोरटे रिकाम्या हाताने परतले. यानंतर पुन्हा त्यांनी गुरुवारी सुरुवातीला बीडमधील राजीव गांधी चौक व नंतर राजुरीतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. ते फुटत नसल्याचे पाहून थेट उचकटून जीपमध्ये भरत असताना पोलिस आले आणि त्यांचा भंडाफोड झाला. 

 

यांची होती ‘टीप’
बाळू मुंडे हा खालापुरीचा रहिवासी आहे. बँक फोडण्याचा प्रयत्न करण्याच्या दिवशीच बँकेत तीन गोण्या भरून स्टेशनरी साहित्य आले होते. बाळूला मात्र तीन गोण्या भरून पैसे आले असे वाटले अन् खालापुरीची बँक फोडण्याचा प्रयत्न झाला. तर श्रावण पवार हा राजुरीचा रहिवासी आहे. त्यामुळे गावातील एकमेव एटीएममध्ये पैसे आहेत की नाही याची त्याला माहिती असायची. शिवाय दोन्ही ठिकाणी पोलिस चौकी नसल्याने ते सोपे होते.

 

दोघे जण रेकॉर्डवर  
पकडण्यात आलेला बाळू मुंडे याच्यावर बारामतीमध्ये दुचाकी चोरीचा गुन्हा आहे, तर मास्टरमाइंड असलेल्या व सध्या फरार असलेल्या आरोपीवरही नगर जिल्ह्यात जबरी चोरी, वाहनचोरीचे गुन्हे आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... आरोपींची तयारी पाहून पोलिसही झाले थक्क

 

बातम्या आणखी आहेत...