आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • जावयाच्या निधनाने उस्मानाबादकर शोकाकूल..शेतकरी कुटुंबांसाठी भय्यू महाराजांचे योगदान Bhaiyyu Maharaj Suicide In Indore Lament Of Farmers Family In Osmanabad

जावई भय्यू महाराजांच्या करुण अंताने मराठवाडा हळहळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद - मध्य प्रदेशातील रहिवासी तथा मराठवाड्याचे जावई असलेल्या भय्यू महाराजांच्या अकाली निधनाने या भागातील त्यांच्या चाहत्यांना माेठा धक्का बसला अाहे. मराठवाड्यातील अाैरंगाबाद, बीड, उस्मानाबादसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत भय्यू महाराजांनी सर्वाेदय परिवाराच्या माध्यमातून माेठ्या प्रमाणावर सामाजिक काम केले. राज्यात काही ठिकाणी त्यांनी अाश्रमही उभारले अाहेत.   


उस्मानाबाद येथील राजाराम निंबाळकर यांची कन्या माधवी यांच्याशी भय्यू महाराजांचा विवाह झाला होता. त्यामुळे त्यांचे उस्मानाबादशी घट्ट नाते हाेते. नंतर निंबाळकर परिवार अाैरंगाबादेत स्थायिक झाला, त्यामुळे अाैरंगाबादेतही त्यांचा स्नेह वाढला. बीडमध्येही त्यांचा माेठा भक्त परिवार अाहे. या तिन्ही शहरांसह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी माेठ्या प्रमाणावर सामाजिक कामे केली. भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली हाेती. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला हाेता.


महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम व्यक्ती, राजकारणी, समाजसेवकांशी त्यांचा स्नेह हाेता. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रसिद्ध गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल, अभिनेते मिलिंद गुणाजी इत्यादी अनेक दिग्गज भय्यू महाराजांच्या आश्रमात जाऊन आले आहेत.  


अण्णांच्या आंदोलनात मध्यस्थाची भूमिका

२०११ मध्ये अण्णा हजारेंनी लाेकपालसाठी केलेले अांदाेलन मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने भय्यू महाराजांनी दूत म्हणून पाठवले होते.  भय्यू महाराज हे सद््गुरू धार्मिक ट्रस्ट नावाने ट्रस्ट चालवत असत. या ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत. तसेच, कैद्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करत. शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप, सामुदायिक विवाह साेहळे करण्यासाठीही त्यांनी मदत केली. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले.

 

बीडच्या अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना अाधार 
 सन २०१२ ते २०१६ या दुष्काळाच्या काळात भय्यु महाराजांच्या सूर्योदय परिवार व श्रीसद‌्गुरु दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टने बीड जिल्ह्यातील तीनशेहून अधिक गावांत जलसंधारणाचे कामे हाती घेतली हाेती.  अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेत धीर दिला. २५ जून २०१६ रोजी ‘मानवता का महाकुंभ’ या कार्यक्रमांतर्गत भय्यू महाराजांच्या पुढाकारातून १० हजार शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले हाेते. यासह ५० हून अधिक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तूही त्यांनी दिल्या हाेत्या. जिल्ह्यातील १५३ गावात महाकुंभचा संकल्प त्यांनी केला हाेता. या योजनेतून त्यांनी जिरायती शेती सुधारण्यासाठी त्यांचे प्रयत्न हाेते. 

बातम्या आणखी आहेत...