आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • धक्कादायक! पोटच्या मुलाने आई वडिलांना नारळ पाण्यातून पाजले विष Boy Give Poison To His Parents Through Coconut Water In Latur

घर नावावर करून घेण्यासाठी आई-वडिलांना पाजले विष;

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी मुलगा ज्ञानदीप कोटंबे - Divya Marathi
आरोपी मुलगा ज्ञानदीप कोटंबे

लातूर- लातूरमधील घर आपल्या नावे करून देण्याचा तगादा लावलेल्या मुलाने आई आणि वडिलांना नारळ पाण्यातून विष दिले. त्यात सेवानिवृत्त प्राचार्य वडिलांचा मृत्यू झाला. नारळपाणी न प्यायल्यामुळे आई बचावली. तिच्याच फिर्यादीवरून मुलाविरोधात शनिवारी पहाटे खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केली.


पोलिसांच्या माहितीनुसार, परभणीत प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले सादुराव कोटंबे (६५) मूळचे अहमदपूर तालुक्यातील रहिवासी. त्यांनी लातूर येथे घर बांधले. निवृत्तीनंतर ते औरंगाबाद येथे आपल्या मुलासह राहायचे. दीड महिन्यांपूर्वी त्यांचा लहान मुलगा ज्ञानदीप याचा विवाह झाला. तो लातूरमध्ये पत्नीसह राहायचा. बेरोजगार ज्ञानदीपने लातूरमधील घर नावावर करून द्यावे, असा लकडा लावला होता. परंतु मोठा भाऊ, आम्ही औरंगाबादला राहतो. काही दिवसांनंतर घर तुझ्या नावावर करू, असे वडिलांनी सांगितले होते. याचा राग मुलाच्या मनात होता. आठ दिवसांपूर्वी ज्ञानदीपने पत्नीमार्फत आई, वडिलांना लातूरला बोलावून घेतले. १० ते १३ जूनपर्यंत राहिल्यानंतर ते परत जाण्यासाठी निघाले. पण सुनेने साडी घेऊ म्हणून गंजगोलाईतील कापड बाजारात गेले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तिघेही घरी परतले.

 

घरी आलेल्या आई,वडिलांना ज्ञानदीपने स्वत: नारळ सोलून आई, वडिलांना दिले. दोघांनी नारळपाणी पिण्यास प्रारंभ केला असता त्याची चव कडवट लागत असल्याचे सांगत गयाबाई यांनी दोन ते चार घोट पिऊन ते बाजूला ठेवले. काही क्षणांतच सादुराव यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे पती-पत्नी रुग्णालयात गेले. त्यांना सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. गुरुवारी रात्री उपचार सुरू असताना सादुराव यांचा मृत्यू झाला, तर नारळपाणी कमी प्यायल्याने गयाबाई बचावल्या. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सादुराव यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा अहवाल आला. शुक्रवारी सायंकाळी सादुराव यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या पत्नी गयाबाई यांनी थेट पोलिस ठाणे गाठून मुलाने नारळ पाण्यातून विष दिल्यामुळेच सादुरावांचा मृत्यू झाल्याची तक्रार दिली. गांधी चौक ठाण्यातून ही तक्रार शिवाजीनगर ठाण्यात गेली. ज्ञानदीपने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

 

नारळपाण्यात विष, चव ओळखू नये म्हणून साखर कालवली 
एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेला ज्ञानदीप कोटंबे हा सादुराव यांचा दुसरा मुलगा आहे. बेरोजगार असलेला ज्ञानदीप लातुरात एकटाच राहायचा. गेल्या महिन्यात त्याचा विवाह झाला. लातूरमधील घर आपल्या नावावर करीत नाहीत याबद्दल त्याचा आई, वडिलांवर राग होता. त्याने थंड डोक्याने कट रचला. उंदीर, घूस मारण्याचे विष त्याने घरात आणून ठेवले होते. आई, वडील खरेदीसाठी गेल्यानंतर त्याने नारळपाणी आणले. त्यात विष टाकले. चव ओळखता येऊ नये यासाठी नारळ पाण्यात साखर टाकली.आणि ते आई, वडिलांना प्यायला दिले. त्यामुळेच वडिलांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...