आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 लाखांसाठी डॉक्टर पत्नीचा छळ, बीडमध्ये पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- गाडी घेण्यासाठी माहेरहून पंधरा लाख रुपये घेऊन ये म्हणत डॉक्टर पत्नीचा छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

धनश्री सम्राट गुट्टे (रा.औरंगाबाद, ह.मु. बीड) या दंत शल्यचिकित्सक असून सध्या त्यांची आंतरवासिता सुरू आहे. त्यांचा वर्षभरापासून सासरच्या मंडळींकडून गाडी घेण्यासाठी माहेरहून पंधरा लाख रुपये घेऊन ये म्हणत छळ करण्यात आला. शारीरिक व मानसिक त्रास देतानाच शिवीगाळही करण्यात आली. माहेरी बीड येथे आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेत या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून सम्राट संभाजी गुट्टे, रुख्मिणबाई संभाजी गुट्टे, राघवेंद्र गुट्टे व रुचिकेतन गुट्टे या चार जणांविरोधात छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...