आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलिका प्रकल्पातील मासे मृत अवस्थेत, पसरली दुर्गंधी, धरणाची सुरक्षा वाऱ्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी- धारूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुंडलिका प्रकल्पात अचानक मासे मृत झाल्याने खळबळ उडाली आहे. धरणाच्या भिंतीवर मासांचा सडा पडलेला दिसला. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे धरणातील पाणी अशुद्ध झाले आहे. या घटनेवरून प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. अद्याप एकही अधिकारी प्रकल्पाकडे फिरकलेला नाही.

 

तालुक्यातील उपळी, गावंदरा, धुनकवाड, आंबेवडगाव मोरवड, हिवरगाव्हन या गावांना या प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. दुषित पाणी प्यायल्याने परिसरात रोगराई वाढण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाने या धरणावर सुरक्षारक्षकाची नियुक्त केली नाही.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...धरण परिसरात मृत माशांचा पडलेला सडा

 

बातम्या आणखी आहेत...