आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्ज्वलांच्या अवयवदानासाठी नांदेडला ग्रीन कॉरीडॉर, 7 किमीचे अंतर पार केले 4 मिनिट 18 सेकंदात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- परभणी येथील उज्ज्वला विजय मुंदडा या ब्रेन डेड रुग्णाच्या अवयव दानासाठी शुक्रवारी नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडोर करण्यात आला. अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडोर करण्याची ही शहरातील तिसरी घटना होती. तथापि, खासगी रुग्णालयातून अवयव काढून पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.  पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर चोख बंदोबस्त केल्याने रुग्णालयापासून विमानतळापर्यंत अंदाजे  सात किलोमीटरचे अंतर  ४ मिनिटे १८ सेकंदात पार करण्यात आले.  


परभणी येथील उज्ज्वला विजय मुंदडा (३५) या महिलेचा बुधवारी अपघात झाला.  डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  डॉ. ऋतुराज जाधव यांनी उज्ज्वला या ब्रेन डेड झाल्याची माहिती नातेवाइकांना दिली. त्यावर नातेवाइकांनी विचारविनिमय करून त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. शहरात ग्लोबल हॉस्पिटलला अवयव दान शस्त्रक्रियेची शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे डॉ. त्र्यंबक दापकेकर यांच्याशी संपर्क साधून रुग्णाला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येऊन अवयवदानाची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 


मुंबईला लिव्हर पाठवले
अवयव दानाची शस्त्रक्रिया करणारे डॉ. त्र्यंबक दापकेकर यांंनी दिलेल्या माहितीनुसार उज्ज्वलाचे हृदय चांगल्या स्थितीत नव्हते. त्यामुळे तो अवयव काढता आला नाही. तिचे लिव्हर (यकृत)मुंबईला पाठवले. किडनी औरंगाबादला रस्तामार्गे पाठवण्यात आली. तर तिचे डोळे स्थानिक शासकीय रुग्णालयातील नेत्रपेढीला देण्यात आले.


ग्रीन कॉरिडोर
अवयव ज्या रुग्णालयातून नेण्यात येणार होते ते रुग्णालय आयटी चौक परिसरात  गर्दीच्या ठिकाणी आहे. हॉस्पिटल ते विमानतळ हा रस्ताही गर्दीचा असल्याने या मार्गावर ग्रीन कॉरिडोर करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते.  रात्रीच पोलिसांनी या मार्गावर  बंदोबस्त लावला.  सकाळी ८. ५० मिनिटांनी अवयव घेऊन जाणारा ताफा  विमानतळाकडे निघाला. अवघ्या ४ मिनिट १८ सेकंदात  ७ कि.मी. अंतर पार करण्यात आले. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... ग्रीन कॉरिडॉरचे फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...