आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रकुल स्पर्धेत भूमिपुत्र राहुल आवारेने पटकावले सुवर्णपदक, पाटादेकरांना आंनदाचे भरते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली आहे. पाटोद्यातील पैलवान राहूल आवारे याने सुवर्णपदकाच्या संख्येत एकाने भर टाकली भारतीय वेळेनुसार आज (गुरूवार) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राहूल आवारेने 57 किलो वजन गटात कॅनडाचा एस. टकाशी या मल्लशी दोन हात केले. भूमिपुत्राने सुवर्णपदाची कमाई केल्याने पाटोदेकरांना आनंदाचे भरते आले आहे. वस्ताद काका पवार यांचा शिष्य असलेल्या राहुलने बीडचे नाव जगभरात पोहचवले आहे.


होमहवनही करून राहूलच्या विजयासाठी प्रार्थना
पाटोद्यात उत्सहाचे वातावरण असून ही कुस्ती पाहण्यासाठी जागोजागी स्क्रीन लावण्यात आले आहेत. तर बुधवारपासूनच होमहवनही करून राहूलच्या विजयासाठी प्रार्थना केली जात होती. तीन दिवसांपासून पाटोदा येथील जयहनुमान व्यायाम शाळेत होमहवन करून राहुलच्या विजयासाठी प्रार्थना केली  होती. राहुल हा मुळचा नगर जिल्ह्यातील माळेवाडी येथील रहीवाशी राहुलचे वडील बाळासाहेब आवारे यांनी त्यांच्या भविष्यासाठी माळेवाडीतून स्थलांतर करून पाटोदा येथे आले.

 

एकेकाळी मल्ल असलेल्या बाळासाहेब आवारे यांनी मोठा मुलगा राहुल व धाकटा मुलगा गोकुळ यांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले. पाटोदा येथील 18 बाय 16 च्या पत्र्याच्या सेडमध्ये तालीम सुरू केली. याच तालमीत कुस्तीचे धडे गिरवले. पुण्याला गेल्यानंतर हरिश्चंद्र बिराजदार राहुलचे वस्ताद झाले. राष्ट्रकूल स्पर्धेच्या 57 किलो वजन गटात राहूल आवारे याने कॅनडाचा एस. तहकाशी याचा 15-7 असा पराभव करून सुवर्ण पदक पटकाविले ही विजयाची वार्ता समजातच पाटोदा शहरात फटाक्यांची आतेषबाजी आंनदोत्सव साजरा केला. पाटोदा येथे राहुल आल्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... राहुल आवारेच्या आईची प्रतिक्रीया आणि संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...