आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री साडेअकराला गणेशने मुलीला नेले शेतात, तिचा गळा अावळला, तिथेच केली अात्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज- दहावीत शिकणाऱ्या मुलीला पाहण्यासाठी पाहुणे येऊन गेल्याचे कळताच तरुणाने मुलीच्या वडिलांना फाेन केला. मुलीशी बाेलू देण्याची मागणी केली. वडिलांनी मुलाची मागणी फेटाळून लावत फाेन कट केला. यानंतर संतापलेल्या तरुणाने रात्री मुलीचे घर गाठत मुलीला जवळच्या शेतात अाेढून नेत तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने त्याच शेतातील बाेरीच्या झाडाला गळफास घेत अात्महत्या केली. केज तालुक्यातील ढाकेफळ येथे शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली. 


घटना घडली तेव्हा मुलीचे अाई-वडील गावातील एका कुटुंबाकडे अायाेजित भजनाला गेले हाेते. घरात अल्पवयीन मुलगी व तिचा गतिमंद भाऊ दाेघेच हाेते. मुलीच्या खुनाचे कारण अस्पष्ट असल्याने केज येथील उपजिल्हा रुग्णालयातून मुलीचा मृतदेह अंबेजाेगाई येथील स्वाराती रुग्णालयात नेण्यात अाला. इथे मृतदेहावर इन कॅमेरा शवविच्छेदन 
करण्यात अाले. 

 

गणेशला शामली आवडायची, दाेन्ही कुटुंबीयांमध्ये होते सलाेख्याचे संबंध

शामली (मुलीचे नाव बदललेले) केज येथील एका शाळेत दहावीला शिक्षण घेत हाेती. तिने नुकतेच दहावीचे चार पेपरही दिले हाेते. गावातील २५ वर्षीय गणेश रामधन थाेरात याला शामली अावडायची. दाेन्ही कुटुंबीयांमध्ये सलाेख्याचे संबंध असल्याने दोघांचीही चांगली अाेळख हाेती. घटनेच्या दिवशी गणेश प्रचंड संतापात हाेता. शामलीला पाहण्यासाठी बाहेरगावावरून पाहुणे अाल्याची माहिती त्याला मिळाली हाेती. शामली अापल्याला अावडत असून, शामलीच्या वडिलांना लग्नाविषयी बाेलावे अशी मागणी गणेशने त्याच्या वडिलांकडे केली हाेती. शामलीच्या घरी नुकतेच एका नातेवाईकाचे निधन झाल्याने क्रियाकार्य पार पडल्यावर शामलीच्या वडिलांकडे विषय काढताे असे अाश्वासन गणेशच्या वडिलांनी त्याला दिला हाेते. गणेश यामुळे अस्वस्थ हाेता. त्याने शामलीच्या वडिलांना शुक्रवारी चार वेळा फाेन केला. शामलीला बाेलू देण्याची मागणी त्याने त्यांच्याकडे केली. मात्र, त्यांनी नकार दिला. व पुन्हा फाेन करू नकाेस असे बजावले. यानंतर बिथरलेल्या गणेशने शामलीच्या घरी जात तिला जवळच्या शेतात अाेढत नेले. गावातील कीर्तनाच्या कार्यक्रमाला शामलीचे अाई-वडील गेले हाेते. तर शामलीचा गतिमंद भाऊ घरीच हाेता. ताे गणेशला विराेध करू शकला नाही.  यानंतर गणेशने शामलीचा गळा अावळून तिचा खून केला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर शेतातील बाेरीच्या झाडाला गळफास घेत गणेशनेही अात्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे, जमादार राजेंद्र वाघमारे, चाफळे, पोलिस नाईक वाले, शिंदे, नाईक, यांनी घटनास्थळी  भेट देऊन पंचनामा केला.

 

थोरात कुटुंबातील तिसरी आत्महत्या  
केज तालुक्यातील ढाकेफळ येथील गणेशचा मोठा भाऊ व बहीण यांनी  वेगवेगळ्या घटनांत काही वर्षांपूर्वी आत्महत्या  केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्यांच्या घरातील ही आत्महत्येची तिसरी घटना आहे. गणेशच्या पश्चात घरात त्याचे आई-वडील दोन  विवाहित बहिणी आहेत.

 

जबाब घेतले जाणार   
अंबेजाेगाई येथील स्वाराती रुग्णालयात मुलीच्या मृतदेहावर इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात अाले असून प्रकरणी आम्ही दाेनही कुटुंबीयांचे जबाब घेणार आहे. यानंतर गुन्हा नोंदवण्याची पुढील कार्यवाही करण्यात येईल.   
- राजेंद्र वाघमारे, पोलिस जमादार, युसूफवडगाव.

बातम्या आणखी आहेत...