आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड बलात्कारप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतले; आरोपी मौलाना साबेर फारुखी निसटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड / माजलगाव- शहरातील चुनाभट्टी भागातील ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मदरशातील शिक्षक मौलाना साबेर फारुखी याने आणखी एका मुलीवर बलात्कार केल्याचे तपासात उघड झाले आहे.   इतवारा पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित मदरशातील मुलींचे पोलिसांनी जबाब घेतले असता आणखी एका मुलीवर त्याने बलात्कार केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मौलानावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात माजलगाव येथून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.  मात्र मुख्य आरोपी मौलाना साबेर फारुखी माजलगाव येथून लोकांच्या तावडीतून निसटला. 


नांदेडच्या चुनाभट्टी येथील  मदरशामध्ये नांदेडसह अन्य जिल्ह्यातील मुली शिक्षणासाठी येतात. या मुलींना मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत दाखवून त्यांच्यावर मदरशातील मौलाना बलात्कार करत असे.  माजलगाव तालुक्यातील दोन मुली शिक्षणासाठी या मदरशात आहेत. त्यातील ११ वर्षाच्या मुलीस मौलानाने अश्लील चित्रफीत दाखवून बलात्कार केला.  त्यानंतर त्याने मुलीच्या लहान बहिणीचाही विनयभंग केला. हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने इतवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून रविवारी रात्री इतवारा पोलिस ठाण्यात मौलानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


पाच जण चौकशीसाठी ताब्यात

नांदेड शहरातील चुनाभट्टीतील मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील  बलात्कार प्रकरणात त्यांच्या आईवडिलांना माजलगाव  पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास अडथळा आणल्या प्रकरणी  माजलगाव येथील पाच जणांना मंगळवारी पहाटेच नांदेड पोलिसांनी चौकशीसाठी  ताब्यात घेतले.  पीडितेचे आई - वडील सुरूवातीला माजलगाव शहर ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.  परंतु माजलगाव येथील पाच जणांनी या प्रकरणात मध्यस्थी करून तक्रार देण्यास थांबवले होते. यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी    नांदेडच्या इतवारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.


मौलाना लोकांच्या तावडीतून निसटला

दरम्यान माजलगावच्या काही लोकांनी मौलाना फारुखीला सोमवारी माजलगाव येथे बोलावून घेत बेदम मारहाण केली. त्यांच्या तावडीतून निसटून मौलाना पसार झाला. मंगळवारी पहाटे नांदेडच्या इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दशरथ आडे यांचे पथक माजलगावात आले.  भाटवडगाव येथून पायी चालत येत पहाटे पोलिसांनी  माजलगाव येथील   राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नवाब पटेल, एमआयएमचा तालुकाध्यक्ष शेख इद्रिस पाशा, अस्लम मंजूर मिर्झा, शेख तकी, शेख रफी  रा. भाटवडगांव या पाच जणांना  माजलगाव  पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन नांदेडला नेले आहे.

बातम्या आणखी आहेत...