आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • \'ललिता म्हणून गेली, ललित बनून आला...\' लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेनंतर राजेगावात साळवेचे जंगी स्वागत Police Constable Lalit Salve Come In Home Town Rajgaon

ललित हाेऊन परतली ललिता; राजेगावकरांनी केले स्वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/ राजेगाव (ता. माजलगाव) - लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर गावी परतलेल्या ललित साळवेचे राजेगावच्या (ता. माजलगाव जि. बीड) गावकऱ्यांनी बुधवारी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. पारंपरिक रांगोळी, हलगीचा नाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीने ललितला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देेण्यात आल्या.   


शरीरातील वेगळ्या गुणसूत्रांमुळे लिंगबदल करण्याची घटना नवीन नाही. परंतु, सरकारी सेवेत असताना उघडपणे यासाठी अर्ज करणे, प्रतिकूल परिस्थितीत झगडा देऊन त्याचा पाठपुरावा करणे, निम्न स्तरावर फेटाळली गेलेली परवानगी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मिळवून आणणे आणि प्रचंड मनोधैर्याच्या बळावर सहा तासांची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करणे हे ललितचे यश. बीड जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस दलात कार्यरत ललिता साळवेची मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात पहिली लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर ती ललित बनली. मंगळवारी त्याला डिस्चार्ज देण्यात अाला.

 

बुधवारी  ललित साळवेचे मूळ गावी राजेगावी आगमन झाले. या वेळी गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून तसेच हलगीच्या नादात त्याचे स्वागत केले. पहिल्या शस्त्रक्रियेस मिळणाऱ्या प्रतिसादानंतर सहा महिन्यांनंतर ललितची दुसरी शस्त्रक्रिया होणार आहे. तोपर्यंत फिटनेस आणि पाेलिस ड्यूटी यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे ललितने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर ललित बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात रुजू होणार आहे.   

 

गावकऱ्यांनी दिलेल्या साथीमुळेच हा पुनर्जन्म शक्य झाला : ललित   
माझ्यात झालेले बदल, लिंगबदलासाठी मी केलेल्या अर्जाची झालेली जाहीर वाच्यता, बातम्या हे सारे माझ्या ग्रामीण भागातील मंडळींसाठी धक्कादायक आणि अनाकलनीय होते. परंतु, या पूर्ण प्रवासात पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर यांच्यासोबतच गावाने ज्या प्रकारे माझा स्वीकार केला हे बघून मी गलबलून गेलाे आहे. गावकऱ्यांसह माध्यमांचेही मी मनपूर्वक आभार मानतो, अशा भावना ललितने व्यक्त केल्या आहेत.

 

राजेगावात ललितच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी रांगोळी रेखाटण्यात आली होती.  फटाके वाजवून, औक्षवण करून त्याचे गावात स्वागत करण्यात आले. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा...'ललिता म्हणून गेली, ललित बनून आला' लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेनंतर गावात साळवेंच्या जंगी स्वागताचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...