आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील पंचशीलनगर भागातील एका गिरणी चालकावर चार दिवसांपूर्वी अॅट्रॉसिटीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला होता. फरार असलेल्या गिरणी चालकाने सोमवारी नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवाडी शिवारात आत्महत्या केली.

 

शहरातील पंचशीलनगर भागात महादेव बापूराव सालपे यांची पिठाची गिरणी आहे. एका अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणात मुलीच्या घरच्यांनीही त्यांना मारहाण करून त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली होती. चार दिवसांपूर्वी या प्रकरणात अॅट्रॉसिटीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, तेव्हापासून सालपे हा फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. सोमवारी सकाळी नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आनंदवाडी शिवारात एका झाडाला गळफास घेऊन सालपे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...