आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीत पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाच्या हातात ठोकल्या बेड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- शहरातील बरकत नगर भागातील पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेतील आरोपी पळून जाण्याचा तयारीत असताना परळी पोलिसांनी त्याला अटक केली.

 

बरकत नगर भागातील पाच वर्षीय चिमुरडीला इद्रिस बशीर शेख याने आपल्या घरात नेऊन तिच्या अत्याचार केला. मुलीने ही घटना कुटुंबियांना सांगितल्यानंतर परळी शहर पोलिसांत इद्रिस विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी शहर सोडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...