Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | लातूरनजीकच्या तळ्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू Two death In Lake Latur

लातूरनजीकच्या तळ्यात पोहायला उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

प्रतिनिधी | Update - Jun 13, 2018, 05:18 PM IST

लातूर- शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या कव्हा रोडवरील तळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घ

  • लातूरनजीकच्या तळ्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू Two death In Lake Latur

    लातूर- शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या कव्हा रोडवरील तळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली असली तरी त्याची कोणालाच माहिती नव्हती. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर शहरातील माळी गल्ली येथील तीन मुले मंगळवारी दुपारी घराबाहेर पडली. तिघे मिळून कव्हा रस्त्यावर असलेल्या तळ्यात पोहायला उतरली. निर्मनुष्य परीसर असलेल्या या भागात सायंकाळच्या वेळी हे तिघे पोहायला उतरले. त्यातील सोहेल पठाण आणि बळी लोखंडे हे दोघे पाण्यात थोडे पुढे गेल्याने गाळात फसले. पाण्यात दोन्ही मित्र गायब झाल्याने तिसरा मुलगा (अद्याप नाव समजलेले नाही) घाबरला. त्यातूनच त्याने पळ काढला. घरी आल्यानंतरही त्याने घाबरून कुणालाही याची माहिती दिली नाही. रात्री उशिरापर्यंत बळी लोखंडे आणि सोहेल पठाण हे घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी तिसऱ्या मुलाने भीत-भीत ते दोघे कव्हा येथील तलावात बुडाल्याचे सांगितले. बुधवारी पहाटे तळ्यात शोध सुरू केला असता बळी आणि सोहेलचे मृतदेह आढळून आले.

    दरम्यान, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Trending